निद्रानाश
निद्रानाश ही मनुष्यास होणारी एक व्याधी आहे. यात झोपेचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळ-जवळ नसते. हा एक मनाशी संबंधित आजार आहे. हा सहसा लवकर लक्षात येत नाही व त्याने गंभीर रूप धारण केल्याशिवाय जाणवत नाही.
मनुष्यास आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग जडतो. मानवाला जीवन जगण्यास आवश्यक अशा अन्न, पाणी तसेच शुद्ध हवा याचेबरोबरच झोपही तितकीच आवश्यक असते. झोप व मेंदू याचा अतिशय निकटचा संबंध असतो. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले अथवा त्यावर अनावश्यक ताण आल्यास झोपेचे चक्रही बिघडते.निसर्गाच्या घड्याळाप्रमाणे असलेल्या जीवनशैलीशी फारकत हे याचे प्रमुख कारण आहे.
झोपेचे चक्र चार स्तरांचे असते. त्यातील पहाटेची साखरझोप फारच महत्त्वाची असते. यादरम्यान मेंदू हा मेंदूतील पेशी मजबूत करण्याचे व त्याच्या दुरुस्तीचे कार्य करतो. हे झोपेचे चक्र व्यवस्थित राहिले असता, व्यक्ती शांत राहते.
उद्भव
[संपादन]निद्रानाश हा स्वतंत्रपणे अथवा इतर रोगांसोबतही होऊ शकतो.अतिताण, तीव्र वेदना, थॉयराईडचा त्रास, रेस्टलेस लेग सिंड्रोम, मासिक पाळी बंद होणे इत्यादींनी देखील हा रोग बळावतो.मदिरेचे सेवन,अति कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन, निकोटिन असलेल्या पदार्थांचे सेवनही यास कारणीभूत ठरते.रात्रपाळीतील कामही याचे एक कारण असू शकते कारण याने 'जैविक घड्याळ'बिघडते. दिवसा झोप येते. हृदयविकार असणे हे देखील याचे एक कारण आहे.
उपचार
[संपादन]झोपेसाठी आवश्यक असणारी स्वच्छता, सूर्यप्रकाश घेणे, काळोखी व शांत झोपेची जागा, नियमित व्यायाम व जीवन प्रणालीतील आवश्यक बदल हे यावर उपचार आहेत. झोपेच्या गोळ्या या जास्त प्रमाणात व बराच काळ घेऊ नयेत.
आयुर्वेदानुसार
[संपादन]शामक औषधे, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, रात्री झोपतांना गरम दूध व खडीसाखरेचे सेवन हे काही उपाय आहेत.पण ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच करावेत.[ संदर्भ हवा ]
जगातील सुमारे ३५ टक्के व्यक्ती निद्रानाशाने ग्रस्त आहेत.[ संदर्भ हवा ]
निद्रानाशावरील मराठी पुस्तके
[संपादन]- निद्रानाश (महेश केळुसकर)