मन
जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत.
प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला ही जागृत मन असावे.
मानवी मन ही या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे. मन मोकाट मोकाट ही बहिणाबाई चौधरी यांची कविता त्यात त्यांनी मनाची चंचल अवस्था प्रकट केली आहे.
मनशुद्धी
[संपादन]याबाबत एक श्लोक असा आहे:
सदाचारेण सर्वदा शुद्धं भवति मानसम् |
निर्मलंच विशुद्धंच मानसं देवमंदिरम् ||
अर्थ: सर्वदा चांगले आचरण केल्याने मन शुद्ध होते. असे निर्मळ व विशुद्ध मन हे (जणू) देवाचे मंदिरच आहे. मानाने वागा मनाने कृती करा पण मन षड्रिपू ने बांधलं असेल तर तथाकथित योगाभ्यास करूनच पवित्रता धारण होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू, सूचना: डचा पाय मोडावा) असे म्हणतात.
या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.
१. काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना.(इत्यादि कामना)
२. क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट)
३. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच)
४. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.(आकर्षण,फळ आकर्षणामुळे कार्यरत)
५. मद म्हणजे गर्व, अति अभिमान.(घमंड,अहंकार)
६. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन)
मनाचे वर्णन
[संपादन]मनाचे वर्णन दयाराम ह्या हिंदी संतांनी खालील प्रकारे केले आहे:
मन लोभी,मन लालची,मन लंपट, मन चोर |
मनके मतें न चालिये, पलक पलक मन और ||
मनाची चंचलता
[संपादन]शहंशहा नावाच्या शायराने मनाच्या चंचलतेचे असे वर्णन केले आहे:
बालक मन और वानरा,कबहुं न रे निचंत |
बाल और वानर सोत है,यह सोवत में भी उडन्त ||
अर्थ:बालक मन व वानर हे कधीच चुपचाप बसत नाही.बालक व वानर झोपल्यास चुपचाप राहतात पण मन हे झोपेतच उड्डाण भरते.
मनाची एकाग्रता कशी होते ?
[संपादन]मेंदूला एकाच विषयावर केंद्रित करण्याकरिता डोळे व कान या मेंदूच्या आणि पर्यायान मनाच्या खिडक्या बंद कराव्या लागतील. बंद याचा अर्थ झोपेत डोळे व कान बंद असतात तसे नव्हे तर या २ इंद्रियांना सर्वशक्तीनिशी त्या विषयावर केंद्रित केलं पाहिजे .अर्थात पाचही ज्ञानेंद्रियांना एकाच विषयावर केंद्रित केले जाते. उदा: आवडता खेळ, डान्स, चित्रकला इ. आपल्याला काय व्हायचं?, लोखंड कि लोहचुंबक?, यशवान, किर्तीमान, ऐश्वर्यसंपन्न कि अपयशी, दरिद्री, दुःखी? ते आपणच ठरवायचं . आपले मन जेथे रमते ते काम आपण नेहमी करावे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |