ऊर्मिला
उर्मिला | |
---|---|
उर्मिला आणि तिच्या तीन बहिणींचे लग्न | |
जन्म |
उर्मिला |
निवासस्थान | अयोध्या |
ख्याती |
|
जोडीदार | लक्ष्मण |
अपत्ये |
|
वडील | जनक |
आई | सुनयना |
नातेवाईक |
|
उर्मिला हे रामायणातील एक पात्र आहे. ती सीतेची धाकटी बहीण आणि लक्ष्मणाची पत्नी होती. लक्ष्मणाचे जसे त्याचा भाऊ रामावर प्रचंड प्रेम होते, तसेच उर्मिला सीतेला समर्पित होती. हिंदू पुराणातील महान स्रियांमध्ये तिची गणना होते आणि सर्वश्रेष्ठ पतिव्रतांमध्येही तिचा समावेश होतो.
लक्ष्मणाने चौदा वर्षांचा वनवास न झोपता व्यतित केला. पण ते ऊर्मिलामुळे शक्य झाले. कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणासाठी झोप घ्यायची. अशाप्रकारे चौदा वर्षे तिने झोपून व्यतित केली. उर्मिला या अतुलनीय त्यागासाठी प्रसिद्ध आहे.[१]
जेव्हा लक्ष्मण तिला वनवासाला जाण्याचा निर्णय कळवायला आला तेव्हा तिने मुद्दाम राणीचा पोशाख घातला. हे पाहून लक्ष्मण तिच्यावर भडकला आणि तिची तुलना कैकेयीशी केली. पतीचे लक्ष तिच्यापासून विचलित करण्यासाठी तिने हे मुद्दाम केले जेणेकरून तो तिची बहीण आणि भावाची काळजी घेऊ शकेल. हे सगळे समजल्यावर सीता म्हणाली की, उर्मिलाच्या त्यागाची बरोबरी १०० सीताही करू शकणार नाहीत.[१][२]
जीवन आणि कथा
[संपादन]उर्मिला ही मिथिलाचा राजा जनक आणि राणी सुनयना यांची मुलगी आणि सीतेची धाकटी बहीण आहे. तिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथाचा तिसरा मुलगा लक्ष्मण याच्याशी झाला होता. त्यांना अंगद आणि चंद्रकेतू असे दोन पुत्र झाले. लक्ष्मणाचे जसे त्याचा भाऊ रामावर प्रचंड प्रेम होते, तसेच उर्मिला सीतेला समर्पित होती
उर्मिला ही देवी नागलक्ष्मीचा पुनर्जन्म आहे. काही लोककथांनुसार तिला सोमदा नावाची मुलगी होती असे सांगितले जाते.
लक्ष्मण जेव्हा राम आणि सीतेसह वनवासाला गेला तेव्हा उर्मिला त्याच्याबरोबर येण्यास तयार होती परंतु त्याने संकोच केला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तिला अयोध्येत थांबायला सांगितले. एका पौराणिक कथेनुसार उर्मिला १४ वर्षे सतत झोपते. असे मानले जाते की १४ वर्षांच्या वनवासात लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि मेहुणीच्या रक्षणासाठी कधीही झोपला नाही. वनवासाच्या पहिल्या रात्री, जेव्हा राम आणि सीता झोपले होते, तेव्हा निद्रा देवी लक्ष्मणाला प्रकट झाली आणि त्याने तिला असा आशीर्वाद मागितला की जेणेकरून त्याला कधीही झोप येऊ नये. देवी निद्राने त्याला विचारले की त्याच्या ऐवजी दुसरे कोणी झोपू शकेल का? लक्ष्मणाने म्हणाला की त्याची पत्नी उर्मिला झोपू शकते. हे ऐकल्यानंतर देवी निद्राने उर्मिलाला याबद्दल विचारले आणि उर्मिलाने आनंदाने ते स्वीकारले. उर्मिला या अतुलनीय बलिदानासाठी उल्लेखनीय आहे ज्याला उर्मिला निद्रा म्हणतात.[१][२]
एका पौराणिक कथेनुसार, असे म्हणले जाते की जेव्हा लक्ष्मण उर्मिलाकडे आपला निर्णय कळवायला आला तेव्हा तिने राणीचा पोशाख घातला होता. हे पाहून लक्ष्मण तिच्यावर रागावला आणि तिची तुलना कैकेयीशी केली. आपल्या पतीचे लक्ष तिच्यापासून विचलित करण्यासाठी तिने हे मुद्दाम केले जेणेकरून तो तिची बहीण आणि भावाची काळजी घेऊ शकेल. जेव्हा सीतेला हे कळले तेव्हा ती म्हणाली की उर्मिलाच्या त्यागाची बरोबरी १०० सीताही करू शकत नाहीत.
उर्मिलाचा मृत्यू हा मांडवी आणि श्रुतकीर्तीसह सीतेचा मृत्यू आणि त्यांच्या सासूच्या मृत्यूदरम्यान झाला असे म्हणले जाते.
मंदिर
[संपादन]राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात लक्ष्मण आणि उर्मिलाला समर्पित एक मंदिर आहे. हे मंदिर १८७० मध्ये भरतपूरचे तत्कालीन शासक बलवंत सिंग यांनी बांधले होते आणि भरतपूर राज्याच्या राजघराण्याने ते एक राजेशाही मंदिर मानले जाते.[३]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ a b c "Urmila, The Sleeping Princess". The New Indian Express. 2022-01-22 रोजी पाहिले.
- ^ a b "जागरणजोष".
- ^ "Temple Profile". devasthan.rajasthan.gov.in. 2022-01-22 रोजी पाहिले.