[go: up one dir, main page]

Jump to content

कुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुश हा श्रीराम अर्थात दाशरथी रामाच्या दोन जुळ्या मुलांपैकी एक. त्याच्या जुळ्या भावाचे नाव लव असे होते. ह्यांचा उल्लेख हिंदू धर्मातील महाकाव्य असलेल्या रामायणात येतो. रामायणातील उत्तरकांडानुसार लव-कुश ह्यांचा जन्म वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात झाला. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे सर्वप्रथम लव आणि कुश ह्यांनी पाठ केले आणि विविध ठिकाणी जाऊन ते गाऊन दाखवले. पुढे अयोध्येत श्रीराम आणि इतर अयोध्येतील जनांसमोर लव आणि कुश हे सीता आणि श्रीरामांचे पुत्र असल्याचे समोर आले असे रामायणात सांगितले आहे.