सुमात्रन वाघ
Appearance
सुमात्रन वाघ (Panthera tigris sumatrae) इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढ्ळून येणारी वाघाची प्रजाती आहे. अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा ऱ्हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.