[go: up one dir, main page]

Jump to content

व्हियेतनाम युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियेतनाम युद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
मेजर ब्रूस पी क्रॅन्डल हे उडवीत असलेले बेल युएच-१डी हेलिकॉप्टर अमेरिकी सैनिकांना 'शोधा व नष्ट करा' ह्या मोहिमेवर उतरवून आकाशाकडे झेप घेताना
मेजर ब्रूस पी क्रॅन्डल हे उडवीत असलेले बेल युएच-१डी हेलिकॉप्टर अमेरिकी सैनिकांना 'शोधा व नष्ट करा' ह्या मोहिमेवर उतरवून आकाशाकडे झेप घेताना
दिनांक १ नोव्हेंबर १९५५ ते ३० एप्रिल १९७५
(१९ वर्षे, ५ महिने, ४ आठवडे व १ दिवस)
स्थान दक्षिण व्हियेतनाम, उत्तर व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस
परिणती उत्तर व्हियेतनामचा विजय
अमेरिकी सैन्याची आग्नेय आशियातून माघार

व्हियेतनाम गणराज्य खालसा
व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस मध्ये साम्यवादी सरकारे

प्रादेशिक बदल दक्षिण व्हियेतनामउत्तर व्हियेतनाम यांचे समाजसतावादी व्हियेतनाम गणराज्यात एकत्रीकरण
युद्धमान पक्ष
साम्यवाद्यांविरुद्ध आघाडी:

दक्षिण व्हियेतनाम
Flag of the United States अमेरिका
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
फिलिपिन्स
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
थायलंड ध्वज थायलंड
कंबोडिया ख्मेर गणराज्य
लाओस लाओस

यांच्या पाठिंब्याने:
स्पेन ध्वज स्पेन
Flag of the Republic of China तैवान

साम्यवादी आघाडी:

उत्तर व्हियेतनाम
व्हियेत काँग
कंबोडिया ख्मेर रूज
लाओस पॅथेट लाओ

यांच्या पाठिंब्याने:
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
Flag of the People's Republic of China चीन
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया
चेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया
क्युबा ध्वज क्युबा
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया

सेनापती
गो डिन यीम
गुयेन व्हान थियू
अमेरिका लिंडन बी. जॉन्सन
अमेरिका रिचर्ड निक्सन
दक्षिण कोरिया पार्क चुंग-ही
ऑस्ट्रेलिया रॉबर्ट मेंझिस
हो चि मिन्ह
व इतर
सैन्यबळ
१८.३ लाख ४.६१ लाख

व्हियेतनाम युद्ध (व्हियेतनामी: Chiến tranh Việt Nam)[] हे शीत युद्धकालातील व्हियेतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये लढले गेलेले युद्ध होते. ह्या युद्धाचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर १, इ.स. १९५५ ते एप्रिल ३०, इ.स. १९७५पर्यंत मानण्यात येतो.

हे युद्ध उत्तर व्हियेतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हियेतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले. आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता. व्हियेत काँग ह्या दक्षिण व्हियेतनाममधील परंतु उत्तर व्हियेतनामच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने कम्युनिस्टविरोधी सेनेविरुद्ध शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर केला. जवळजवळ २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अखेरीस अमेरिकेला माघार घ्यावी लागली व ५८,२२० सैनिक गमावल्यानंतर १५ ऑगस्ट १९७३ रोजी अमेरिकेने आपले सर्व सैन्य ह्या युद्धामधून काढून घेतले. एप्रिल १९७५ मध्ये दक्षिण व्हियेतनामची राजधानी सैगॉनवर उत्तर व्हियेतनामने कब्जा मिळवला व ह्या युद्धाचा अंत झाला. युद्धाची परिणती म्हणून दक्षिण व उत्तर व्हियेतनामचे एकत्रीकरण झाले व व्हियेतनामचे साम्यवादी गणराज्य ह्या देशाची निर्मिती झाली. तसेच आग्नेय आशियामधील कंबोडियामध्ये पोल पोटच्या नेतृत्वाखाली ख्मेर रूज ह्या कम्युनिस्ट पक्षाने सरकार स्थापन केले. लाओसमध्ये देखील कम्युनिस्ट राजवट सत्तेवर आली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अधिकृत वृत्तस्रोत - नावाचा वापर". 2011-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ एप्रिल, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]