कर्मान प्रांत
Appearance
कर्मान استان کرمان | |
इराणचा प्रांत | |
कर्मानचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | कर्मान |
क्षेत्रफळ | १,८०,७२६ चौ. किमी (६९,७७९ चौ. मैल) |
लोकसंख्या | २९,३८,९८८ |
घनता | १६ /चौ. किमी (४१ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-08 |
कर्मान किंवा कार्मेनिया (फारसी: استان کرمان;ओस्तान ए केर्मान) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या आग्नेय भागात स्थित असलेला हा प्रांत आकाराने इराणमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून कर्मान ह्याच नावाचे शहर येथील राजधानीचे शहर आहे.
बाफ्त, बरदसीर, बाम, जिरोफ्त, जौपर, राफसंजान, झरांद, सिरजान, शहर ए बाबक, केर्मान, महान, रायेन, कहनुज, घलेगंज, मनुजान, रूडबार ए जोनोब, अनबार आबाद आणि रावार ही कर्मान प्रांतातील काही मोठी शहरे आहेत.
प्राचीनकाळात हा भाग कार्मेनिया या नावाने ओळखला जायचा.[१] येथील भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असून आजवर येथे अनेक मोठे भूकंप झाले आहेत.
संदर्भ व नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2012-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-17 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |