अऊत
Appearance
हा लेख परीपूर्ण व्हावा ह्या दृष्टीने ह्या शब्दाशी संबधीत मुक्त छायाचित्र किंवा चित्र हवे आहे. संचिका चढवा
मराठी भाषा
[संपादन]उच्चार
|
|
नाम
[संपादन]- प्रकार : पदार्थवाचक सामान्यनाम
वचन
[संपादन]एकवचन
- अनेकवचन : अऊतं
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
- स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.
अर्थ
[संपादन]नांगर; शेतजमीन नांगरण्यासाठी वापरण्याचे उपकरण
भाषांतरे
[संपादन]भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]शब्द केव्हा वापरावा
[संपादन]शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]वाक्यात उपयोग
[संपादन]ट्रॅक्टर म्हणजे अऊताची सुधारित आवृत्ती होय.
वाक्प्रचार
[संपादन]- अऊत लावणे
- अर्थ : शेतीच्या मशागतीचे काम करणे.
म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]संभाव्यतः ग्रामीण मराठी बोली भाषेतील शब्द.
अधिकची माहिती
[संपादन]- अऊत ला औत असेही म्हणतात.
- हे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते, ज्यापासून जमीन उकरली जाते.
- अऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरतो व जमीन नांगरली जाते.
- श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलराम हे इतिहासातील असे एकमेव व्यक्ती आहेत जे अऊताचा वापर शस्त्राप्रमाणे करत असत. त्यामुळे बलरामांचे हलधर असेही एक नाव आहे.
- आधुनिक काळात ट्रॅक्टर नावाच्या वाहनयंत्राने अऊताची जागा घेतली आहे.
- अऊताचा वापर करून शेती नांगरणाऱ्या माणसाला अऊत्या असे म्हणतात.
विभक्ती
[संपादन]विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अऊत | अऊतं |
द्वितीया | अऊतास, अऊताला, अऊताते | अऊतांना, अऊतांते |
तृतीया | अऊताने, अऊताशी | अऊतांनी, अऊतांशी |
चतुर्थी | अऊतास, अऊताला, अऊताते | अऊतांना, अऊतांते |
पंचमी | अऊताहून | अऊतांहून |
षष्ठी | अऊताचा, अऊताची, अऊताचे | अऊतांचा, अऊतांची, अऊतांचे |
सप्तमी | अऊतात | अऊतांत |
संबोधन | अऊता, हे अऊता | अऊतांनो |
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]
|
|