Google Lens ने तुम्ही जे पाहता ते शोधू शकता, गोष्टी अधिक जलद पूर्ण करू शकता आणि तुमच्या सभोवतालच्या जगाच्या संपर्कात राहू शकता.
मजकूर स्कॅन आणि भाषांतरित करा तुम्हाला दिसत असलेल्या शब्दांचे भाषांतर करा, तुमच्या संपर्कांवर व्यवसाय कार्ड सेव्ह करा, पोस्टरवरून तुमच्या कॅलेंडरवर इव्हेंट जोडा आणि वेळेची बचत करण्यासाठी गुंतागुंतीचे कोड किंवा मोठे परिच्छेद तुमच्या फोनवर कॉपी आणि पेस्ट करा.
झाडे आणि प्राणी ओळखा तुमच्या मित्रमैत्रिणीच्या अपार्टमेंटमध्ये कोणते झाड आहे किंवा पार्कमध्ये दिसलेला कुत्रा कोणत्या जातीचा होता हे जाणून घ्या.
तुमच्या जवळपासची ठिकाणे एक्सप्लोर करा महत्त्वाच्या खूणा, रेस्टॉरंट आणि स्टोअरफ्रंटविषयी अधिक जाणून घ्या. रेटिंग, ऑपरेशनचा कालावधी, ऐतिहासिक तथ्ये आणि बरेच काही पहा.
तुम्हाला आवडेल असा लूक शोधा तुम्हाला आकर्षित करणारा ड्रेस पाहायचा आहे का? किंवा तुमच्या बैठकीच्या खोलीला साजेशी खुर्ची शोधताय का? तुमच्या आवडीशी मिळतेजुळते कपडे, फर्निचर आणि होम डेकोर शोधा.
काय ऑर्डर करायची ते जाणून घ्या Google Maps मधील पुनरावलोकनांवर आधारित रेस्टॉरंटच्या मेनूमधील लोकप्रिय डिश पहा.
कोड स्कॅन करा QR कोड आणि बारकोड त्वरित स्कॅन करा.
*मर्यादित उपलब्धता आणि सर्व भाषा किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही. पुढील तपशिलांसाठी
g.co/help/lens येथे जा. काही Lens वैशिष्ट्यांसाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.